आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षकांसाठी ट्रीट:प्रसाद ओक आणि अमृता सुभाष यांची गाजलेली मालिका 'अवघाची हा संसार' पुन्हा एकदा येतेय भेटीला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अवघाची हा संसार' ही मालिका येत्या 24 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक उतार चढाव सुरु आहेत. अनेक नियमांच्या बंधनांमध्ये मालिकांची शुटिंग सुरु तर झाले, पण तरी अजूनही वातावरण सर्वसामान्य व्हायला वेळ लागेलच. सद्य परिस्थितीत प्रेक्षकांना जोडून ठेवण्यासाठी अनेक वाहिन्या जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा नव्याने सुरु करत आहेत. झी युवानेही आता लोकप्रिय मालिका 'अवघाची हा संसार' पुन्हा एकदा नव्याने सुरु करायचा निर्णय घेतलाय. यापुर्वी झी युवावर 'जुळून येती रेशीमगाठी' आणि 'वहिनीसाहेब' या दोन लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु केल्या गेल्या.

2006 मध्ये दाखवली गेलेली 'अवघाची हा संसार' ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती. अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या. अमृताने यात आसावरी नावाच्या गावातल्या एका साध्या सरळ मुलीची भुमिका साकारली होती. आपल्या तत्वांशी प्रामाणिक असणारी कर्तव्यनिष्ठ अशा आसावरीचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं होतं.

जवळजवळ चार वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. 2010 मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता तब्बल दहा वर्षांनी ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

बातम्या आणखी आहेत...