आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुरुवातीपासून ज्या मराठी सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगली आणि केवळ सिनेमाच्या शीर्षकावरून सिनेमाप्रती उत्सुकता वाढली तो सिनेमा म्हणजे ‘चंद्रमुखी’. काही दिवसांपूर्वी प्रसाद ओक यांचा ‘चंद्रमुखी’ सिनेमा हा महाराष्ट्र सरकारने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच ऑन फ्लोर जाणार ही आनंदाची बातमी प्रेक्षकांना देण्यात आली होती. आणि आता या सिनेमाच्या मुहूर्त सोहळ्यामुळे ‘चंद्रमुखी’ सिनेमा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला.
‘प्लॅनेट मराठी’चे अक्षय बर्दापूरकर आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’चे पियूष सिंह यांची निर्मिती असलेल्या ‘चंद्रमुखी’ सिनेमाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला आणि यावेळी या सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक, निर्माते अक्षय बर्दापूरकर, पियूष सिंह, संगीतकार अजय-अतुल उपस्थित होते. सिनेमाचा मुहूर्त सोहळा म्हणजे आता चित्रीकरणाला सुरुवात होणार याचाच अर्थ असा की लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला 'चंद्रमुखी' नावामागे कोणाचा चेहरा आहे हे समजणार. अर्थात त्यासाठी प्रेक्षकांना अजून काही क्षणांची प्रतिक्षा करावी लागेल.
View this post on InstagramA post shared by Prasad Oak (@oakprasad) on Nov 7, 2020 at 10:50pm PST
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे.
मुहूर्ताच्या वेळी दिग्दर्शक राजेश मापुस्कर आणि फॅशन डिझायनर विक्रम फडणीस उपस्थित होते. या चित्रपटाची कथा एका स्त्री भोवती फिरते जी समाजात चालणा-या अपारंपारिक मार्गावर स्वत:च्या वास्तवतेचा शोध घेते.
View this post on InstagramA post shared by manjiri oak (@manjiri_oak) on Nov 8, 2020 at 5:43pm PST
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स् निर्मित या चित्रपटात प्रसाद ओक यांचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकर यांची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.