आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लिटिल चॅम्प्स'ची नवी इनिंग:आता परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार पंचरत्न,  'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या नवीन पर्वातून लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे लाडके पंचरत्नदेखील एका नव्या भूमिकेतून समोर येणार आहेत.

झी मराठीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला यांसारखे उत्कृष्ट गायक दिले ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षक कधीच विसरले नाहीत. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा त्यांच्या भेटीस येणार आहे. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे लाडके पंचरत्नदेखील एका नव्या भूमिकेतून समोर येणार आहेत.

याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना प्रेक्षकांचा लाडका मोदक म्हणजेच प्रथमेश लघाटे म्हणाला, "लवकरच 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं नवीन पर्व सुरु होणार आहे. यात माझ्यासोबत आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत सहभागी होणार आहेत. यावेळी आम्ही स्पर्धक म्हणून नाही तर ज्युरी म्हणून या कार्यक्रमाचा हिस्सा असणार आहोत. ऑडिशनची प्राथमिक फेरी पार पडली असून, लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येईल.'

पुढे प्रथमेश म्हणाला, 'गेली बारा वर्ष आम्ही पाच जण एकमेकांच्या संपर्कात होतो आता या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा आमची धमाल मजा मस्ती सुरु झाली आहे. प्रथमच ज्युरीची भूमिका निभावत असल्यामुळे त्यासाठी आमची वेगळी तयारी चालू आहे. आम्ही खूप ज्युनिअर असलो तरी मागील 12 वर्षांचा अनुभव चांगला आहे. ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांची गाणी आम्ही ऐकली. वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मिळाली. कोणाचा गळा चांगला आहे. कोणाची तान छान, कोणावर मेहनत घेता येऊ शकते, या गोष्टी समजत असल्यामुळे हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. आताची मुलं, टॅलेंटेड तर आहेतच पण स्मार्ट देखील आहेत. त्यामुळे या पर्वात मजा येणार आहे."

बातम्या आणखी आहेत...