आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुझ्या इश्काचा नादखुळा'मध्ये न्यू एंट्री:रघू आणि स्वातीच्या आयुष्यात येणार माया नावाचं वादळ, मायाच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री प्रतीक्षा जाधव

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मायाच्या एंट्रीने रघू आणि स्वातीच्या आयुष्यात होणार आहे उलथापालथ

स्टार प्रवाहवरील 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकेत धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रघु आणि स्वातीच्या आयुष्यात माया नावाचं वादळ येणार आहे. खरंतर रघु आणि स्वातीचं नातं आता कुठे खुलायला लागलं होतं. मात्र माया या पात्रामुळे तुझ्या इश्काचा नादखुळा ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे. अभिनेत्री प्रतीक्षा जाधव माया ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. प्रतीक्षाला याआधी बऱ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण आणि मोलकरीण बाई या मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

खरंतर माया तिच्या नावा सारखीच मायावी आहे. स्वतःचा खरा चेहेरा समोरच्याला कधीही कळू न देण्यात सराईत. कुलकर्णी कुटुंबात येण्यामागे मायाचं नेमकं कोणतं षडयंत्र आहे? मायाच्या एंट्रीने रघू आणि स्वातीच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ होणार आहे हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.

बातम्या आणखी आहेत...