आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:प्रियदर्शन जाधवच्या "लव सुलभ"चे टीझर पोस्टर लाँच, चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ठाणे येथे "लव सुलभ" चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. "लव सुलभ" या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रियदर्शनने सांभाळली असून या चित्रपटाचे टीझर पोस्टरदेखील नुकतेच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.

"लव सुलभ" हे चित्रपटाचे नाव अतिशय आकर्षक आहे. चित्रपटाच्या नावातून ही एक प्रेमकथा असेल असा अंदाज बांधता येतो. टीझर पोस्टरवर मेहंदी असलेल्या हातावरील बोटांत अंगठी आहे आणि त्या हातानं भिंतीवर स्त्री-पुरुषाची आकृती काढलेली दिसते पण चित्रपटाच्या कथेचा आशय अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. प्रियदर्शन जाधवसह प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटाची प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे.

देवी सातेरी प्रॉडक्शन्सच्या प्रभाकर परब यांनी "लव सुलभ" चित्रपटाची निर्मिती केली असून सहनिर्मिती स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचे असून छायांकन केदार गायकवाड करणार आहेत तर सतीश चिपकर कलादिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत. ठाणे येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून ठाण्याचे महापौर नरेशजी म्हसके आणि चित्रपटाचे निर्माते प्रभाकर परब यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. यावेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

एकंदरीतच चित्रपटाचे नाव, स्टारकास्ट आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये याबद्दलचे नक्कीच कुतूहल निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...