आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन चित्रपटाची घोषणा:अभिनेता पुष्कर जोग आणि सोनाली कुलकर्णी 'व्हिक्टोरिया'च्या निमित्ताने पुन्हा एकत्र, स्कॉटलंडमध्ये होणार चित्रपटाचे चित्रीकरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका या चित्रपटात आहे.

'ती आणि ती', 'वेल डन बेबी' चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. नुकतीच त्यांनी 'व्हिक्टोरिया' या मराठी चित्रपटाची घोषणा केली.

पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका या चित्रपटात आहे. हीरा सोहल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांची निर्मिती संस्था गुसबम्पस एंटरटेनमेंटचा एकत्रित तिसरा मराठी चित्रपट आहे. तसेच अभिनेता पुष्कर जोगचा सोनाली कुलकर्णीसह हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी ती आणि ती, तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत .

आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह-निर्माता आहेत. नुकताच या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...