आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक फसवणूक प्रकरण:'टर्री' चित्रपटाचे निर्माते विक्रम धाकतोडे पोलिसांच्या ताब्यात, निर्माता अमोल कागणेंची केली लाखोंची फसवणूक

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्माते विक्रम धाकतोडे यांच्यावर लाखोंच्या हेराफेरीचे आरोप
  • गुरुवारी हिंजवडी पोलिसांनी पनवेल येथून ताब्यात घेतले आहे.

‘टर्री’ या आगामी चित्रपटाचे निर्माते विक्रम धाकतोडे यांना हिंजवडी पोलिसांनी गुरुवारी अटक केल्याचे वृत्त आहे. अभिनेता, निर्माता अमोल कागणे यांची 30 लाखांचा गंडा घालून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. चित्रपट व्यवसायात सहभागी करून घेण्याचे खोटे आमिष दाखवून अमोल कागणेला 29 लाख 5 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी 12 जानेवारी रोजी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी कारवाई करत विक्रम यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादी अमोल कागणे हे चित्रपट निर्माते असून 'हलाल', 'लेथ जोशी', 'वाजवूया बँड बाजा', 'परफ्यूम', 'बेफाम' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच ते चित्रपट खरेदी विक्रीचा व्यवसायही करतात. तर आरोपी विक्रम धाकतोडे चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतात.

विक्रम धाकतोडे यांनी चित्रपटाच्या अॅग्रीमेंटचा करार करतो आणि काही चित्रपट नावावरदेखील करतो असे सांगत फिर्यादीकडून वारंवार पैसे घेतले.तसेच त्यांच्यात लेखी करार झाला असून फिर्यादी अमोल यांच्याकडून चित्रपट विकत घेण्यासाठी पैसे घेऊन तेच पैसे दुसऱ्या कामाकरीता वापर केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...