आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव्या भूमिकेत 'जयडी':'तुझं माझं जमतंय'मध्ये अभिनेत्री पूर्वा शिंदेची एंट्री, आता साकारणार सकारात्मक भूमिका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जयडी सारख्या नकारात्मक भूमिकेनंतर आता साकारणार सकारात्मक राजनंदिनी

छोट्या पडद्यावरील 'तुझं माझं जमतंय' या मालिकेत आता एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जयडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मालिकेतील अश्विनी हिच्या 'गेली सासरला, पाय तिचा घसरला' या आवडत्या मालिकेतील राजनंदिनीची भूमिका पूर्वा साकारतेय. राजनंदिनी म्हणजे अत्यंत सोज्वळ, गोड, सगळ्यांना सांभाळून घेणारी, आदर्श सून, आदर्श मुलगी, आदर्श बायको आणि सतत चेहऱ्यावर हास्य असणारी अशी आहे.

पूर्वाच्या या नवीन भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणाली, "तुझं माझं जमतंय या मालिकेत राजनंदिनी, अश्विनी आणि शुभंकर यांच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन येणार आहे. जयडी सारख्या निगेटिव्ह भूमिकेनंतर आता राजनंदिनी सारखी सकारत्मक आणि गोड मुलगी म्हणून मी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. नागरमधल्या कडाक्याच्या थंडीत आम्ही शूटिंग करतोय आणि खूप मजा येतेय. प्रेक्षकांना देखील मालिकेत राजनंदिनीला बघून तितकीच मजा येईल अशी मी आशा करते."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser