आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे अशोक सराफांच्या नाटकाच्या प्रेमात:म्हणाले - व्हॅक्युम क्लिनरच्या 'धक्क्याने' नात्यांतील ताण दूर होतात हे पाहून मजा आली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कलाप्रेमी असल्याचे सर्वश्रूत आहे. त्यांचे हिंदी आणि मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांसोबतचे ट्युनिंगदेखील अतिशय चांगले आहे. ते कायमच चांगल्या कलाकृतींचे तोंडभरुन कौतूक करत असतात. नुकतेच त्यांनी रंगभूमीवर गाजत असलेले व्हॅक्यूम क्लिनर हे नाटक पाहिले आणि या नाटकाचे आणि कलाकारांवर कौतूकाचा वर्षाव केला. मराठीतील विनोदाचे बादशाह अशोक सराफ यांची या नाटकाची महत्त्वाची भूमिका असून त्यांच्यासह अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी यात महत्त्वाची भूमिका वठवली आहे.

राज ठाकरे यांनी अशोक सराफ आणि नाटकाच्या टीमसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले आणि नाटक पाहून आपली प्रतिक्रियादेखील दिली. "काल मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक पाहिले. व्हॅक्युम क्लिनरच्या 'धक्क्याने' नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आली. पण वयाची 75 पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झाले," असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. या नाटकाच्या लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील."

या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांचे आहे. कोरोनाचा काळ वगळता गेली 4 वर्षे 'व्हॅक्यूम क्लीनर' हे नाटक रंगभूमीवर जोरात सुरु असून त्याचे आतापर्यंत 300 हून अधिक प्रयोग झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...