आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिवर्ल्ड अपडेट:'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये संजूचा होणार सत्कार, गुलाबची होणार मोठी फजिती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजा रानीची गं जोडी मालिकेचा स्वातंत्र्य दिन विशेष भाग 15 ऑगस्ट रोजी संध्या 7 वाजता बघता येणार आहे.

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजूने प्राण पणाला लावून रणजीतची सुटका केली. आता रणजीतच्या साथीने ती अपर्णाचं सत्य देखील घरच्यांच्या समोर आणणार आहे. त्यासाठी रणजीतसोबत ती नवी खेळी देखील रचते आहे. याचसोबत डॉक्टर तोडकरच्या दवाखान्याचा पर्दाफाश कसा करता येईल यासाठी रणजीत तिला योग्य ते मार्गदर्शन करतो आहे. घर आणि कामातील जबाबदार्‍या संजू उत्तमरीत्या पार पाडते आहे. रणजीत आणि संजीवनीने आता एकच ध्यास घेतला आहे कसं गुन्हेगारीला पुर्णपणे दूर करता येईल.

तर दुसरीकडे, घरच्या होऊ घातलेल्या पूजेचा मान नक्की कोणाला मिळणार यावर देखील चर्चा सुरू असताना आईसाहेबांनी इच्छा व्यक्त केली आहे की, अपर्णा आणि सुजीतने पूजेला बसले पाहिजे. आता याचदिवशी अपर्णाचं पितळ संजू उघडं करेल की अपर्णाचं पुन्हा बाजी मारेल हे लवकरचं कळेल.

यासगळ्यात आनंदाची बाब म्हणजे स्वातंत्र्यदिनानिमित्त संजूचा खूप मोठा सत्कार गुलाबच्या हाती होणार आहे. यामुळे गुलाबची मात्र मोठी फजिती होणार हे नक्की.

रणजीतला झालेल्या अटके प्रकरणाच्या संजू पूर्ण मुळाशी गेली आणि बनावटी औषधा प्रकरणी खर्‍या गुन्हेगाराला अटक केली. याबाबत तिचा हा सत्कार होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...