आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘करोना गो, गो करोना गो’:रामदास आठवले यांच्या कविता ऐकण्यासाठी 'लाव रे तो व्हिडिओ', लॉकडाऊनमध्ये केलेल्या कविता ऐकण्याची मिळणार संधी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांच्या लॉकडाऊनमध्ये केलेल्या कविता आता प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.

आपल्या सगळ्यांचे लाडके सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, हे आता 'झी युवा' वाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. 'लाव रे तो व्हिडिओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम ते घेऊन आले. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडतोय. 'लाव रे तो व्हिडिओ' हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली.

या कार्यक्रमामुळे अनेकांना घरातूनच आपले कौशल्य सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले, त्यामुळे प्रेक्षकांसोबतच कलाकारांचा देखील हा कार्यक्रम आवडता झाला आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना सुप्रसिद्ध व्यक्तींचे व्हिडीओज पाहायला मिळणार आहेत.

‘करोना गो, गो करोना गो’ हे कोण म्हणालं होतं असं कुणालाही सांगण्याची गरज नाही. हा व्हिडिओ संबंध महाराष्ट्रात तुफानासारखा पसरला आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गो करोना गो म्हणताच देशभरात प्रसिद्ध झाले. आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे.

शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांच्या लॉकडाऊनमध्ये केलेल्या कविता आता प्रेक्षकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. या कविता रामदास आठवले झी युवावरील लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमात सादर करणार आहेत. त्यांच्या या लॉकडाऊनमधल्या कविता नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतील असं म्हणायला हरकत नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser