आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लवकरच दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं म्हणतात. मातृत्वासारखं दुसरं सुख नाही. दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता तर दीपाला मातृत्वाचं सुखही मिळणार आहे.
आनंदाच्या या काळात मात्र दीपाला कार्तिकची साथ मिळत नाहीय. कार्तिकच्या विचित्र वागण्यामुळे दीपा सध्या प्रचंड तणावात आहे. आता दीपाच्या या आनंदावर विरजण पडणार असल्याचं चित्र आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोनुसार, कार्तिक दीपाच्या पोटात वाढणारी मुलं माझी नसल्याचे सांगतोय. यावरुन सौंदर्या कार्तिकवर हात उगारते. एकुणच डोहाळे जेवणाचा कार्यक्रमात नेमकं काय नाट्य घडणार याची उत्सुकता आहे.
डोहाळ जेवणाच्या या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबात मात्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. हिरवी साडी आणि पारंपरिक फुलांच्या दागिन्यांमध्ये दीपाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. लवकरच प्रेक्षकांना 'रंग माझा वेगळा' मालिकेतलं हे नवं वळण बघायला मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.