आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस फेम तेजस्विनीसाठी खास रणवीर सिंगची पोस्ट:म्हणाला - जिंकून ये आपण सेलिब्रेट करु; तेजस्विनीने घरात पूर्ण केले 50 दिवस

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सिझन चौथा सध्या खूप चर्चेत आहे. मग ते टास्क असो त्यातील सदस्यांचे नाते असो किंवा मग सदस्यांमध्ये असलेले वाद विवाद असो... स्वत: ला सिध्द करण्याच्या प्रयत्नात घरातला प्रत्येक सदस्य आहे. सदस्यांना टास्कपेक्षा देखील कशाची भीती वाटतं असेल तर ती नॉमिनेशनमध्ये येण्याची... नॉमिनेशन पासून कसे दूर रहाता येईल याच्या प्रयत्नात सदस्य असतात.

महाराष्ट्रातील प्रेक्षक आपल्या लाडक्या सदस्याला वोट करून सेफ करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळे असताना सगळ्या अडचणींवर मात करत घरातील सदस्यांनी आता तब्बल 50 दिवस पूर्ण केले असून त्यांनी खूप महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्यांचा लाडका रणवीर सिंह याने तेजस्विनी लोणारी साठी खास शुभेच्छा देणारा व्हिडिओ तयार केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसतं आहे.

तो म्हणाला, 'तेजू शुभेच्छा तू 50 दिवस पूर्ण केले आहेत... महेश सरांना माझा सलाम... आम्ही तुला खूप मिस करतोय.. जिंकून ये आपण सगळे सेलिब्रेट करु," असे रणवीर म्हणाला आहे.

तेजस्विनी लोणारीची पहिल्या दिवसापासून खेळी वेगळीच आहे. प्रत्येक टास्क ती पूर्ण ताकदीने खेळतेच शिवाय घरात प्रत्येकाला ती चांगल्या मैत्रीच्या नात्याने समजुन घेते. नुकताच झालेला राणी मुंगीचा टास्क पण तेजस्विनीने उत्तम रीतीने खेळला.

कोण आहे तेजस्विनी लोणारी?
तेजस्विनी लोणारी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तेजस्विनीने आपल्या करिअरची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटांमधून केली होती. त्यानंतर तिने मराठी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. 'दोघात तिसरा आता सगळं विसरा' या चित्रपटात ती मकरंद अनासपुरेसोबत सोबत झळकली होती. तेजस्विनीने साम दाम दंड भेद, गुलदस्ता, बर्नी, चिनू, नो प्रॉब्लेम, वाँटेड बायको नं. 1, मधू इथे आणि चौघुले तिथे, बाप रे बाप डोक्याला ताप यासारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मराठी चित्रपटांसोबतच तेजस्विनी हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. चित्तोड की राणी पद्मिनी का जौहर ही तिची गाजलेली हिंदी मालिका आहे. तेजस्विनीने आपले शिक्षण हे फिल्म मेकिंगमधूनच पूर्ण केले आहे. एम. ए केल्यानंतर तेजस्विनीने बिझनेस ऑफ फिल्म मेकिंग एण्ड टेलिव्हिजनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...