आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमबॅक:काय सांगता... 'माझ्या नव-याची बायको'मध्ये जुनी शनाया परतणार, ईशा केसकरची एक्झिट तर रसिका सुनीलचे कमबॅक  

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतून रसिका घराघरांत पोहोचली.

लॉकडाऊननंतर आता मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. येत्या 13 जुलै पासून छोट्या पडद्यावर मालिकांचे फ्रेश एपिसोड्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. यातच आता माझ्या नव-याची बायको या गाजत असलेल्या मालिकेसंदर्भात एक बातमी आहे. ती म्हणजे या मालिकेतील जुनी शनाया आता परतणार आहे. होय, मालिकेत आता रसिका सुनील कमबॅक करत असून सध्या शनायाची व्यक्तिरेखा साकारणारी ईशा केसकर यातून एक्झिट घेत असल्याचे समजते. 

झी मराठीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरदेखील मालिकेतील कलाकारांचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले असून 'शनाया येतेय...' असं हे कलाकार सांगताहेत.

सध्या शनायाची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री ईशा केसकर काही वैयक्तिक कारणामुळे ती मालिका सोडणार आहे. त्यामुळे रसिका पुन्हा मालिकेत कमबॅक करणार आहे.

रसिकाने मागील वर्षी या मालिकेचा निरोप घेतला होता. परदेशात फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी तिने ही मालिका सोडली होती. रसिकाने 2018 मध्ये या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता, 2019 तिला प्रवेश मिळाला होता. आता रसिका अमेरिकेहून परतली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. काही दिवसांपूर्वीच तिचे बिकिनीतील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतून रसिका घराघरांत पोहोचली. तिची फॅनफॉलोईंगदेखील खूप मोठी आहे. त्यामुळे मालिकेत रसिकाला पुन्हा एकदा बघण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असणार हे काही वेगळं सांगायला नको.  

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser