आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील शनाया या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच रसिकाच्या आजीचे निधन झाले. तिने सोशल मीडियावर आपल्या आजीसाठी एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
काय म्हणाली रसिका
रसिकाने सोशल मीडियावर आपल्या आजीचे फोटो शेअर करत लिहिले, 'लहानपणीची अशी एकही आठवण नाही ज्यात आजी नाही. माझे बाबा यूएसला असायचे. आई मी आजी, यश (माझा भाऊ) आणि आजोबा हे सगळे घरी राहायचो. मी बाळ असताना मला अंघोळ घालून प्रत्येक आरशात ‘हा पाहा बाळ’ असं म्हणून माझाच चेहरा दाखवून मला हसवणारी आजी, शाळा सुरू झाल्यावर मी झोपेतून उठल्यानंतर मला थेट बाथरुममध्ये नेऊन ठेवणारी, तुझी दुपारची शाळा कधी सुरू होणार असं विचारणारी, गरम गरम जेवायला वाढणारी, घरात सतत काम करणारी, कधीही न थकणारी, रात्री अनेक गोष्टी सांगणारी, गाणी शिकवणारी, अतिशय उत्तम गाणारी, आम्ही कीर्तनावरुन आलो की अध्यात्म आणि विज्ञान याची किती गोड सांगड आहे यावर चर्चा करणारी माझी आई (आजी) काही दिवसांपूर्वी वारली. आजी तुझं अचानक निघून जाणं मनाला चटका लावून गेलं आहे. अपघात हे तुझ्या जाण्याचं कारण चुकीचं होतं. तुझी आठवण खूप येतेय. तुझ्या आत्माला शांती लाभो.' अशा शब्दांत रसिकाने आपले दुःख व्यक्त केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.