आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमाल टीझर रिलीज:महेश मांजरेकरांच्या 'दे धक्का 2' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' तारखेला येतोय चित्रपट

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकेतच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज डेटसह प्रसिद्ध करण्यात आले.

सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेला 'दे धक्का' सुमारे 14 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद चित्रपटाला मिळाला होता. 'दे धक्का' चित्रपटाने रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान मिळवले होते आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या 5 ऑगस्ट 2022 रोजी 'दे धक्का 2' रिलीज होणार आहे. नुकताच चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित करुन चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय...’, म्हणत हा धमाल टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा सगळ्या जुन्या पात्रांची झलक दिसत आहे. पण यावेळी काळ्या-पिवळ्या टमटमऐवजी सर्वजण कारमध्ये दिसत आहेत. त्यामुळे मकरंद जाधव, सुमती जाधव, धनाजी, सूर्यभान जाधव, सायली आणि किसनाला भेटण्यासाठी आता प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. विशेष म्हणजे 'दे धक्का 2'ची ही धमाल यंदा ट्रीप मुंबई-कोल्हापूर नव्हे तर, कोल्हापूर ते थेट लंडन असणार आहे.

'दे धक्का 2' मध्ये पहिल्या 'दे धक्का'प्रमाणेच स्टारकास्ट आहे. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी आणि सिक्वेलमध्ये संजय खापरे, गौरी इंगवले, प्रवीण विठ्ठल तरडे, विद्याधर जोशी, भारती आचरे असे बरेच कलाकार या चित्रपटात आहेत.

या चित्रपटाची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनेंट यांच्या स्वाती खोपकर आणि यतीन जाधव यांच्या स्काय लिंक एंटरटेनेंट या बॅनर्समध्ये करण्यात आली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ एम. पटेल यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...