आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:'कोविडनी एक अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला', रेणुका शहाणेंची आशालता वाबगावकर यांच्यासाठी भावनिक पोस्ट

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वयाच्या 79 व्या वर्षी आशालता यांची प्राणज्योत मालवली.

मराठी चित्रपटसृष्टीतून आज एक अत्यंत वाईट बातमी आली. ज्येष्ठ अभिनेत्री आशालयात वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सातारा येथे 'आई माझी काळुबाई' या मालिकेचे चित्रीकरण सुरू होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. सोमवारी ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आज पहाटे चार वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मराठी चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक भावनिक पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ''आज फार हतबल झाले आहे. कोविडनी एक अत्यंत सुंदर जिवाचा बळी घेतला. आशालता ताईं अनंतात विलीन झाल्या. अत्यंत मायाळू, प्रेमळ, संवेदनशील, उत्तम कलाकार. मला नेहमीच "बाळा" म्हणत आशीर्वाद देणाऱ्या आशालता ताईच्या आत्म्याला शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली,'' अशा शब्दांत रेणुका यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

  • साता-यात करत होत्या मालिकेचे चित्रीकरण

मागील काही दिवसांपासून आशालता सातारा येथील फलटण तालुक्यात 'आई माझी काळूबाई' या मालिकेचे चित्रीकरण करत होत्या. या मालिकेत अलका कुबल देवी काळूबाईची भूमिका साकारत आहेत. तर आशालता वाबगावकरांचीही महत्त्वाची भूमिका या मालिकेत होती. साताऱ्याजवळ असलेल्या वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचे शुटिंग सुरू होते. आशालता या गेली काही दिवस या शुटिंगसाठी तिथेच होत्या. या मालिकेत एका गाण्याचे शुटिंग सुरू होते. तिथे मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मालिकेच्या सेटवर तब्बल 27 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यातच वयाच्या 79 व्या वर्षी आशालता यांची प्राणज्योत मालवली.

  • आशालता यांची कारकिर्द

आशालता वाबगांवकर यांचा जन्म 31 मे 1941 रोजी गोव्यात झाला. त्या मुळच्या गोव्याच्या असल्याने त्यांनी कोंकणी आणि मराठी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आशालता वाबगांवकर यांनी आतापर्यंत जवळपास 100 हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. अपने पराये या हिंदी चित्रपटातून त्यांनी सिने सृष्टीत पदार्पण केले. तर रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते.

गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिना, मोहनंदा यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. तसेच उंबरठा, सुत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते.

आशालता यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. या शिक्षणाचा त्यांना अभिनय क्षेत्रातही उपयोग झाला होता. संगीत विषयावर आधारीत 'गर्द सभोवती' हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.

बातम्या आणखी आहेत...