आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशात शूट होतोय मराठी सिनेमा:नितीन प्रकाश वैद्य यांच्या आगामी सिनेमासाठी प्रार्थना, रिंकू, सुव्रत लंडनला झाले ‘छूमंतर’, मराठीसह हिंदी भाषेत रिलीज होईल सिनेमा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘छूमंतर’ या आगामी सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये सुरु झाले आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेकांच्या कामाला ब्रेक लागला होता. असं वाटत होतं जणू काय आयुष्यंच थांबलंय... गेल्या सहा-सात महिन्यांत प्रत्येकांनी स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवूण ठेवलं होतं. पण लॉकडाऊन शिथील झाल्यावर जो-तो त्याच्या कामाचे रुटिन सुरु करुन नव्या उमेदीने कामाला सुरुवात करतोय. अशाप्रकारे मनोरंजनसृष्टीने देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्या उत्साहाने शूटिंगला सुरुवात केली आहे.

अलीकडे मराठी सिनेमांचं बहुतांशी शूटिंग हे परदेशात होतं, पण आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाच्या काळात देखील मराठी सिनेसृष्टीने त्यांच्या आगामी प्रोजेक्टचं शूट परदेशात करण्याचं ठरवलं आहे. ‘गच्ची’, ‘नाळ’, ‘मन फकीरा’ यांसारखे अनेक सिनेमांची निर्मिती करणारे निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांचा ‘छूमंतर’ या आगामी द्विभाषिक सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये सुरु झाले आहे. समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ सिनेमात प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरु, सुव्रत जोशी आणि रिशी सक्सेना हे कलाकार असणार आहेत.

मराठी निर्मात्यांमध्ये नितीन प्रकाश वैद्य यांचं नाव नेहमी अव्वल स्थानावर येतं कारण त्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांची मनोरंजनाची रुची जाणून घेऊन सिनेमांची निर्मिती केली आहे. कोरोनाच्या काळात सिनेमाच्या दृष्टिने, शूटिंगसाठी परदेशी प्रवास करणं हे खरंच चॅलेंजिंग आहे. याविषयी मत व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, “सध्याच्या कोव्हिडच्या परिस्थितीत सिनेमा करणं हे तसं आव्हानात्मकच आहे. पण नंतर लक्षात आलं की भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या तुलनेते परदेशात कोव्हिडच्या केसेस कमी आहेत आणि रिस्क पण कमी आहे म्हणून लंडनची निवड केली. यापूर्वी लंडनमध्ये मी खूप वर्ष शूटिंग केले आहे. या सिनेमासाठी फक्त 20 ते 25 जणांचं युनिट आहे. लंडनच्या दिशेने प्रवास करण्यापूर्वी सावधगिरी आणि काळजी म्हणून मी आमच्या डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार महिनाभराचा इम्युनिटी बूस्ट अपचा कोर्स टीमसाठी चालू केला आहे. भारतातून निघायच्या आधी प्रत्येकाच्या तीन कोविड टेस्ट करुन घेतल्या. त्यांचा नेगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरच मी तिकीट्स, व्हिझाचं काम केलं. प्रत्येकाला कोविडचा इन्शुरन्स केला. सॅनिटायझर आणि मास्कचा वापर आपण करतोय याची काळजी आणि जबाबदारी प्रत्येकाने घेतलेली आहे. उत्सुकता तर आहेच पण त्याही पेक्षा भिती आणि काळजी पण आहे. कारण ही खूप मोठी रिस्क आहे. पण सुरक्षिततेच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असणा-या नियमांचे पालन करुन शूटिंग सुरळितपणे नक्की पुर्ण करु.”

प्रार्थना बेहरेने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर तिच्या लंडनच्या सिनेमाची कल्पना तिच्या फोटोमधून चाहत्यांना दिली होती. या सिनेमाच्या शूटिंगसाठीच प्रार्थना लंडनला रवाना झाली होती. या विषयी प्रार्थना म्हणाली, “भारतातून लंडनला यायच्या आधी संपूर्ण क्रू ची कोविड टेस्ट झाली होती आणि अर्थात रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यामुळे आम्हाला लंडनला जाण्याची परवानगी मिळाली. कोविडच्या परिस्थितीमुळे एअरपोर्टवर नेहमी सारखं वातावरण नव्हतं, सगळीकडे शांतता होती. कोरोनामुळे सर्वत्र किती बदल झाला आहे, त्याचा लोकांवर किती परिणाम झाला आहे याची जाणीव एअरपोर्टवरच झाली होती. विमानात देखील सर्व नियम पाळले जात होते, तीन जणांच्या सीटवर मी फक्त एकटीच होते. आम्ही टीम जिथे कुठे जाणार तिथे एकत्रच असणार, शूट लोकेशन ते हॉटेल इतकाच प्रवास करायचा, मास्क-सॅनिटायझरचा वापर करुन प्रत्येकजण काळजी घेतोय. लंडनमध्ये एक चांगली गोष्ट आहे की इथे माणसं कमी आणि जागा जास्त आहे, त्यामुळे सोशल डिस्ट्नसिंग आहेच.”

हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत बनणा-या या सिनेमात रिंकू राजगुरु पण दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रिंकू पहिल्यांदा परदेशात शूटिंग करणार आहे. “मुंबई ते लंडन हा माझा प्रवास एक्सायटमेंटने भरलेला होता. दोन्ही विमानतळावर योग्य ती काळजी घेतली जात होती हे पाहून खूप समाधान वाटले. मी देखील सर्व नियमांचे पालन करुनच प्रवास केला आणि शूटिंगच्या सेटवर वावरताना देखील स्वत:ची काळजी घेईन,” असे रिंकूने सांगितले.

View this post on Instagram

😁😁🍁

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on Oct 13, 2020 at 11:33pm PDT

या सिनेमाच्या शूटिंगविषयी बोलताना सुव्रत जोशीने म्हटले की, “सध्याच्या परिस्थितीत शूटिंगचा अनुभव काही वेगळाच होता. शूटिंगमधील सीन्स करताना, सेटवर वावरताना आम्ही सगळे खूप सावधगिरी बाळगतो. संपूर्ण टीम एक ग्रुप म्हणून एकत्र असतो आणि हॉटेल ते सिनेमाचा सेट आणि सेटवरुन पुन्हा हॉटेलवर एवढीच ये-जा करण्याची परवानगी आहे त्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आणि प्रत्येकजण योग्य ती काळजी घेत आहे.”

नितीन प्रकाश वैद्य यांचा आणखी एक सिनेमा, सोबतीला तगडी स्टारकास्ट यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘छूमंतर’ची उत्सुकता वाढणार यात मुळीच शंका नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser