आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:रिंकू राजगुरुने मानले कोरोना लढवय्यांचे आभार, म्हणाली - 'पोलिस, डॉक्टर, नर्सेसच देव'

अश्विनी तडवळकर. सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या लोकांमुळे आपण आज सुरक्षित आहोत त्यामुळे देवापेक्षाही या लोकांचे आभार जास्त मानायला हवेत.

पोलिस, डॉक्टर नर्सच आपले देव त्यांच्या कामाचं चीज करायचे असेल तर विनाकारण घराबाहेर पडू नका. प्रत्येकाने ठरवून जर ही आपली जबाबदारी पार पडली तर कोरोना हद्दपार होईल, प्रादुर्भाव टळेल. सगळीकडेच पूर्ववत होऊन आनंदाचं वातावरण परत येईल. अशा भावना ‘सैराट’फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केल्या. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती म्हणून रिंकूने मनापासून सर्वांना विनंती केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. लोकांना एवढे दिवस घरी थांबण्याची सवय नाही. शासन निवेदनातून, जाहिरातीतून जनजागृती करत आहे की बाहेर पडू नका, सारखे मास्क बांधा, वारंवार हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा पण असे अनेकदा अनेकांनी सांगूनही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि यामुळे हा रोग पसरत आहे. 

कलेचा आनंद घ्या, मस्त जगा : टवाळखोर लोक विनाकारण रस्त्यावर फिरतात पोलिसांना त्रास देतात, पोलिसांच्या अंगावर हात उगारतात हे चुकीचे आहे. या लोकांमुळे आपण आज सुरक्षित आहोत त्यामुळे देवापेक्षाही या लोकांचे आभार जास्त मानायला हवेत शिवाय घरात बसून आम्ही काय करू हा यक्ष प्रश्न पडला असेल तर कलेचा आनंद घ्या, स्वतःची कलाकृती साकार करा. 

बातम्या आणखी आहेत...