आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन मराठी वेब सीरिज:प्रेमाच्या शोधात 'गुडबॉय', ऋषी सक्सेना स्टारर वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुडबॉय ही वेब सीरिज 3 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

मुलींच्या मागे असलेल्या आणि तरीही खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या तरुणाची गोष्ट 'गुडबॉय' या मराठी वेब सीरिजमधून उलगडणार आहे. उत्तम स्टारकास्ट असलेल्या या वेब सीरिजची निर्मिती कॅफे मराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली असून हंगामा प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज पाहायला मिळणार आहे. या वेब सीरिजमध्ये ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी, अभ्यंग कुवळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, अक्षय राणे यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

‘गुड बॉय’ वेब सीरिजमध्ये ऋषी सक्सेना प्रणव ही भूमिका साकारताना दिसणार आहे. कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला खऱ्या प्रेमाचा शोध आहे. मात्र त्याच्याविषयी मुलींमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? आणि यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो, त्यातून तो यशस्वी होतो का, त्याला खरं प्रेम मिळतं का अशा प्रश्नांची उत्तरं वेब सीरिज पाहिल्यावरच मिळतील. धमाल कथानक, उत्तम अभिनय आणि प्रत्येक एपिसोडला निर्माण होणारी उत्सुकता ही या सीरिजची वैशिष्ट्यं आहेत.

गुडबॉय ही वेब सीरिज 3 मार्चपासून हंगामा प्ले, एमएक्स प्लेअर आणि इतर विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

बातम्या आणखी आहेत...