आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम असतं प्रेमासारखं...:रितेश-जिनिलीयाच्या बहुचर्चित 'वेड'चा टिझर प्रदर्शित; अक्षय कुमार म्हणाला - खरंच सांगतो मला वेड लागलं

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखच्या बहुचर्चित 'वेड' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटातून रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. टिझरमध्ये रितेश आणि जिनिलीया लक्ष वेधून घेत आहेत.

आता या मराठमोळ्या अभिनेत्याचे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मराठमोळ्या शब्दांत कौतुक केले आहे. अक्षयने रितेशसाठी ट्विट करत लिहिलंय, ''माझा भाऊ आणि ॲक्टर आता डिरेक्टर झालाय. त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचा टिझर पाहिला आणि खरंच सांगतो मला वेड लागलं. तुम्हीही पहा तुम्हालाही लागेल….. वेड !''अशा शब्दात अक्षय कुमारने रितेश देशमुखचे कौतुक केले आहे.

रितेशने यावर्षी दिवाळीच्या पाडव्याला चित्रपटाचे पोस्ट शेअर केले होते. 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसह सादर करतोय तारीख आणि चित्रपटाचा फर्स्ट लूक. आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय 30 डिसेंबरला तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या,' असे रितेशने म्हटले होते.

'वेड' या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशने केले आहे. या चित्रपटात तो भूमिकाही करणार आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटात अभिनेत्री जिया शंकरही दिसणार आहे.यावर्षी 30 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

बातम्या आणखी आहेत...