आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा मराठी चित्रपट:रितेश देशमुख , पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस 'अदृश्य'साठी एकत्र, चित्रपटाविषयी रितेश म्हणतो...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल आता दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट 'अदृश्य' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा थ्रिलर मराठी चित्रपट असून यात प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, मंजिरी फडणीस आणि एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुख दिसणार आहेत .

विशेष बाब म्हणजे कबीर लाल आणि रितेश देशमुख तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत. रितेशचा पहिला चित्रपट 'तुझे मेरी कसम'चे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे होते.

याविषयी रितेश म्हणतो, 'मी चित्रपटांत काम करतो याचे कारण कबीर लाल हेच आहेत. सुभाष घई यांच्या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग बघायला मी गेलो होतो, त्यावेळी माझी आणि कबीर लाल यांची पहिली भेट झाली. कदाचित त्यावेळीच त्यांना असे वाटले असेल की मला अभिनेता बनायचे आहे. पुढे तुझे मेरी कसम चित्रपटासाठी त्यांनी माझे नाव सुचवले आणि त्याच चित्रपटाने माझ्या फिल्मी करिअरला सुरवात झाली.'

​​​रितेश पुढे म्हणतो, '20 वर्षांनंतर पुन्हा एकदा कबीर लाल यांच्यासोबत काम करताना मला खूप छान वाटत आहे आणि ते मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आणि त्याचा मी भाग आहे ही गोष्ट माझ्या साठी अत्यंत आनंदाची बाब आहे.'

रितेश देशमुख, पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांच्यासह सौरभ गोखले, अजय कुमार सिंह, अनंत जोग या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे. लवली वर्ल्ड एंटरटेन्मेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

बातम्या आणखी आहेत...