आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवण:वडिलांच्या 75 व्या वाढदिवशी रितेश देशमुख झाला भावूक, अनोख्या पद्धतीने त्यांचे स्मरण करुन म्हणाला - 'रोज तुमची आठवण येते'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुणाच्याही मनाला स्पर्श करेल असा हा भावनिक व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. आजच्या या खास दिवशी त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने अनोख्या पद्धतीने त्यांचे स्मरण केले आहे. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहेत. यात त्याने त्याचे वडील सदैव त्याच्या पाठीशी उभे असल्याचे आपल्या भावनांमधून दाखवले आहे. सोबतच बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. रोज तुमची आठवण येते, अशी भावनिक पोस्टही त्याने लिहिली आहे. कुणाच्याही मनाला स्पर्श करेल असा हा भावनिक व्हिडीओ आहे. 

वडिलांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची आहे रितेशची इच्छा

काही दिवसांपूर्वी रितेशने वडिलांच्या जीवनावर आधारित जीवनपट बनवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. परंतु रितेश त्यासाठी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. रितेशने सांगितले होते की, खूप लोक माझ्याकडे त्यांच्या जीवनपटाची स्क्रिप्ट घेऊन येतात, पण मला अशी स्क्रिप्ट हवी आहे, जी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच माझ्या वडिलांचं आयुष्यदेखील चांगल्या प्रकारे मांडू शकेल. 

दिवंगत विलासराव देशमुख 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 असे दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासरावांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. आणि त्यानंतर त्यांनी दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. 26 मे 1945 रोजी जन्मलेल्या विलासरावांनी 14 ऑगस्ट 2012 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.  

बातम्या आणखी आहेत...