आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीव्ही अपडेट:रोहिणी हट्टंगडी- कविता लाडची गाजलेली मालिका ‘चार दिवस सासूचे’ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 ऑगस्टपासून रात्री 9.30 वाजता कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.
Advertisement
Advertisement

‘…डोळ्यांमधले खारट पाणी.. गालांवरती ओघळणार्‍या मंद मंद हासूचे चार दिवस सासूचे’... हे शब्द कानावर पडले की आजही आठवते ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या मनावर अधिराज्य गाजलेली महामालिका ‘चार दिवस सासूचे’... सासू आणि सून! एका व्यक्तीवर प्रेम करणारे दोन जीव. आपल्या संस्कृतीत सुखी, संपन्न कुटुंबाचा कणा आहे, आनंदी असं वैवाहिक जीवन. आपला संसार सुखी करण्यासाठी, सासरच्या अंगणात आयुष्यभर चंदनासारखी झिजणारी सून… सासरच्या अंगणात नांदायला आलेली ही "सून" कालांतरानी "सासू" होते, नवी सून घरात येते आणि एका ‘तिखट गोड’ नात्याची सुरुवात होते. सर्व नात्यात वरचढ, थोडा संघर्ष, थोडी कुरबुर, तर थोडी माया असते आणि असचं एक नातं म्हणजे सासू सुनेचं.

या नात्यातील मर्म आणि सूत्र ज्या "सासू सुनेला" सापडतं, ते घर आनंदानी बहरतं. आई आणि सासू या एकाच नाण्याच्या दोन बाजू. आईची सासू होतानाची घालमेल, तिचे विचार, तिची भीती हे कोणीच समजू शकणार नाही. मुलाचे लग्न हे आईच्या जीवनातील परमोच्च सुख. प्रत्येक आईचे तिच्या मुलांच्या लग्नाविषयी, तिच्या होणार्‍या सुनेविषयी स्वप्न असतात. ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका देखील याच कथासुत्रावर आधारलेली आहे.

आशालता देशमुख हे खूप मोठ प्रस्थ आहे. त्यांचीदेखील त्यांच्या मुलाच्या लग्नाविषयी अशीच स्वप्न आहेत. घरामध्ये त्यांचा शब्द शेवटचा मानला जातो आणि त्यांनी घेतलेला निर्णय कोणी बदलू शकत नाही. रवी म्हणजेच आशालता यांचा मुलगा त्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांच्या अपरोक्ष अनुराधाशी लग्न करतो आणि तिला सून म्हणून घरी आणतो. अनुराधा अत्यंत साधी, समंजस, स्वाभिमानी मुलगी. रवीने त्याच्या आईच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे ही गोष्ट अनुराधाला माहिती नाही. देशमुखांच्या घरात ती सून म्हणून येते आणि तिच्या खर्‍या प्रवासाला सुरूवात होते. "तुझं माझं" ह्या वाटणीत, भावनांचा - नात्यांचा कस पणाला लागतो आणि उरतो तो "गृह कलह". अनुराधा घराला कशी सांभाळते, तिच्या वाटेवर आलेल्या संकटांना ती कशी खंबीरपणे सामोरी जाते ? या संघर्षात तिला रवीची साथ मिळते ? हे या मालिकेत बघायला मिळणार आहे.

आशालता देशमुख यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अनुराधाची भूमिका कविता लाड-मेढेकरने साकारली आहे.

Advertisement
0