आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालिकेत कमबॅक:देवा आणि डॉलीच्या लव्हस्टोरी मध्ये आजीची होणार धमाकेदार एंट्री, 'डॉक्टर डॉन'मध्ये रोहिणी हट्टंगडी यांचे पुनरागमन

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता मालिकेत पुन्हा एकदा आजीची धमाकेदार एंट्री होणार आहे.

झी युवावरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेतील आजी म्हणजेच रोहिणी हट्टंगडी यांची व्यक्तिरेखा लॉकडाऊन नंतर बहुतांशी व्हिडिओकॉलद्वारे प्रेक्षकांना दिसत होती. पण आता मालिकेत पुन्हा एकदा आजीची धमाकेदार एंट्री होणार आहे.

आजी ही नेहमीची देवा आणि मोनिकाच्या प्रेमाला खतपाणी घालायचं काम करत होती आणि तिच्या येण्यामुळे देवा आणि मोनिका यांची लव्हस्टोरी पुन्हा रुळावर येईल. तसंच कबीर आणि राधाच्या प्रेमालासुद्धा आजीची साथ मिळणार आहे. आजीला मालिकेत पाहणं प्रेक्षक मिस करत होते, त्यामुळे आता आजीच्या एंट्रीमुळे मालिकेत खूप ट्विस्ट्स येणार यात शंकाच नाही.