आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झी युवा सन्मान’ पुरस्कार:रोहित पवार यांचा 'युवा नेतृत्व' पुरस्काराने गौरव

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युवा नेतृत्व हा सन्मान रोहित पवार यांना देण्यात आला आहे.

फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशा कृतीशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा खोवला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा कार्यक्रम झी युवावर शनिवार 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता दाखवण्यात येईल. या पुरस्कार सोहळ्यात युवा नेतृत्व हा सन्मान रोहित पवार यांना देण्यात आला आहे.

राजकारणापेक्षा समाजकारणाचं बाळकडू रोहित यांना मिळालं ते आपल्या आजोबांकडून अर्थात शरदचंद्रजी पवार यांच्याकडून. महाराष्ट्राच्या राजकारणाला रोहित यांनी अक्षरशः वाहून घेतलं. म्हणूनच मुंबईसारख्या शहरात शिक्षण पूर्ण करून गावाला येऊन शेताच्या बांधावरची माती त्यांनी कपाळाला लावली आणि अवघ्या 21 व्या वर्षी बारामती ॲग्रोच्या मुख्य कार्यकारी संचालकपदाची सूत्रे समर्थपणे हाती घेतलीत आणि 2017 मध्ये तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून त्यांची उत्तरे शोधावी यासाठी शिरसुफळ गुळवडी मधून जिल्हा परिषदेची निवडणूक यशस्वीपणे लढवली.

डिजिटल स्कूल, नोकरी महोत्सव, जलसंधारण असे अभिनव उपक्रम करत करत विविध क्षेत्रातील युवक-युवतींची प्रतिभा आणखी प्रबळ करण्यासाठी कबड्डी स्मॅश, नाट्य, कुस्ती अशा विविध स्पर्धांचे रोहित यांनी आयोजन केलं आणि आपल्या संस्कृतीची जाणीव नव्या पिढीला व्हावी म्हणून भजन स्पर्धा ही आयोजित केली. राजकारणात लोकप्रियता जिकती महत्त्वाची तितकीच लोकमान्यता आणि ही लोकमान्यता रोहित यांना त्यांच्या कार्याने मिळवून दिली. अशा या धडाडीच्या व्यक्तिमत्वाला झी युवा नेतृत्व सन्मानने गौरवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...