आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया यांची प्रमुख भूमिका असलेला वेड हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. रितेश-जिनिलीयाची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनचे आकडे याचा पुरावा आहे. केवळ सामान्यच नाही तर सेलिब्रिटी आणि राजकारणीही या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद घेतला. वेड पाहिल्यानंतर 'माऊली... वेड लै भारी' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सोशल मीडियावर थिएटरबाहेरील आणि आतील काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये ते त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत दिसत आहेत. वेड चित्रपट पाहिल्यानंतर ते म्हणतात, "माऊली… ‘वेड’ लै भारी! रितेश देशमुखजी यांनी दिग्दर्शित केलेला वेड हा सिनेमा कार्यकर्त्यांसोबत बघण्याचा योग आज जुळून आला. एक हळूवार आणि भावस्पर्शी प्रेमकहाणी रितेश-जिनिलीया या जोडीने खरोखरंच अप्रतिम साकारलीय. त्यांच्या या चित्रपटाला माझ्या मनापासून शुभेच्छा!" अशा शब्दांत रोहित पवार यांनी चित्रपटाचे कौतुक केले. तसेच त्यांनी प्रेक्षकांनादेखील तुम्हीही अवश्य बघा, असे आवाहन केले आहे.
5 दिवसांत चित्रपटाचा 15 कोटींहून अधिकचा गल्ला
'वेड' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहेत. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने 10 कोटींचा गल्ला जमवला. सोमवारी आणि मंगळवारीदेखील कलेक्शनमध्ये चांगली वाढ बघायला मिळाली आहे. रिलीजच्या पाच दिवसांत चित्रपटाने 15 कोटींहून अधिकचे कलेक्शन तिकीटबारीवर केले आहे.
चित्रपटाचे आतापर्यंतचे एकुण कलेक्शन
20 वर्षांनंतर रितेशचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण
रितेशला 3 जानेवारी रोजी सिनेसृष्टीत पदार्पण करुन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी त्याचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 20 वर्षांनंतर रितेशने 'वेड' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. दिग्दर्शन, अभिनय, निर्माता अशी तिहेरी भूमिकांचे शिवधनुष्य रितेश देशमुखने यशस्वीरित्या पेलले आहे. तर जिनिलीयानेही एवढ्या वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. रितेश आणि जिनिलीयाची जोडी 'वेड'च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.