आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणशोत्सव 2021:गणेशोत्सवानिमित्ताने रोहित राऊतचे लाँच झाले नवे गाणे ‘गजर तुझा मोरया’, गाण्याविषयी रोहित म्हणतो...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोहित राऊतने हे गाणे गायले आहे.

'आपली यारी' गाण्याच्या यशानंतर आता नादखुळा म्युझिक लेबल गणेश भक्तांसाठी नवं सुमधूर गाणं घेऊन आले आहेत. निखील नमीत आणि प्रशांत नाकती ह्यांची निर्मिती असलेलं सचिन कांबळे दिग्दर्शित 'गजर तुझा मोरया' हे गाणं नुकतंच लाँच झाले आहे. 'गजर तुझा मोरया' हे गीत लिहून त्याचे संगीत दिग्दर्शन केलं आहे कुणाल करणने तर रोहित राऊतने हे गाणे गायले आहे.

गायक रोहित राऊत म्हणतो, ”कुणाल-करणच्या संगीतामध्ये एक जादू आहे. गजर तुझा मोरया तुम्हांला भक्तीरसात लीन करेल, ह्याची मला खात्री आहे. नादखुळा म्युझिकसोबत माझं हे पहिलं गाणं आहे. ह्या अगोदरची नादखुळा म्युझिकची दोन्ही गाणी कानसेनांच्या पसंतीस पडली आहेत. त्यामुळे हे ही गाणे सर्वांना आवडेल, अशी मला आशा आहे.”

निर्माते प्रशांत नाकती म्हणतात, “संगीत दिग्दर्शक कुणाल-करण जोडीसोबत गायक रोहित राऊतची भट्टी खूप चांगली जमते. गजर तुझा मोरया ह्या गाण्यातही तुम्हाला ह्याचीच अनुभूती येईल. यंदा महाराष्ट्राने कोरोनासह महापूराच्याही नैसर्गिक संकटाला तोंड दिले आहे. सर्व संकटातून वाट काढताना विघ्नहर्त्याचा धावा करणा-या प्रत्येक भक्ताची भावना ह्या गाण्यातून प्रतीत होत आहे.”

दिग्दर्शक सचिन कांबळे म्हणतात,”महापूरातल्या अनेक कुटूंबांची प्रातिनिधीक कथा गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे घराघरात गणेश आराधनेत ऐकलं जाईल, अशी आशा आहे."

संगीत दिग्दर्शक कुणाल-करण ह्यांनी आजवर अनेक टीव्ही मालिका, एड-फिल्म्सना संगीत साज चढवला आहे. कुणाल-करण म्हणतात, ”आमचं घर कोकणात असल्याने यंदा कोकणासह महाराष्ट्राला पावसाने जे झोडपलंय त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे ह्या गाण्याचे बोल आणि स्वरसाज हृदयातून उमटलेला आहे. रोहितने गायलेले हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, असं मला वाटतं.”

बातम्या आणखी आहेत...