आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसच्या घरातून तिघांची एक्झिट:रोहित शिंदे घराबाहेर, वाइल्ड कार्ड एन्ट्री मीरा जगन्नाथ आणि विशाल निकमही पडलेत बाहेर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात चार चॅलेंजर्सची एन्ट्री झाली होती. त्यांच्या येण्याने खेळात धमाल आणली आणि घरातील सदस्यांची नाती बदलताना दिसली. नव्या सदस्यांच्या घरात येण्याने खेळ बदलताना दिसत होता. बिग बॉसच्या चावडीमध्ये प्रेक्षकांना तसेच घरातील सदस्यांना खूप मोठा धक्का बसला जेव्हा महेश सरांनी विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ यांना घरातून बाहेर येण्यास सांगितले. हे दोघे एकाच आठवड्यासाठी घरात होते, अशा खुलासादेखील त्यांनी यावेळी केला. या दोघांसह या आठवड्यात एक सदस्य घराबाहेर जाणार हे देखील निश्चित होते.

या आठवड्यात चार नॉमिनेटेड झालेल्या सदस्यांपैकी म्हणजेच अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख यांच्यापैकी रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले आहे. एलिमिनेश राउंडमध्ये रोहित शिंदेचे नाव घेताच इतर स्पर्धकदेखील भावुक झाले. रोहितने घर सोडताना घराला नमस्कार केला.

रोहित हा पेशाने डॉक्टर आहे. त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केले आहे.त्याने काही ब्रँडसाठी रॅम्पवॉकही केले आहे. रोहितला फिटनेसची विशेष आवड आहे. तो सोशल मीडियावर ही सक्रीय असतो. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात झळकलेली अभिनेत्री रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे रिलेशनशिपमध्ये होते. रुचिरादेखील काही दिवसांपूर्वीच घराच्या बाहेर पडली आहे.

कशी रंगली चावडी?

महेश मांजरेकरांनी जेव्हा सदस्यांना विचारले तुमच्या मते कोणता सदस्य वजनदार ठरला ? त्यावर अमृता धोंगडे म्हणाली, अपूर्वा मला कुठेतरी कमी वाटते. त्यावर अपूर्वाचे म्हणणे पडले मी याच्याशी सहमत नाही... अमृता म्हणाली, मान्य न करणे ही मुळात चूक आहे आपण खेळाडू म्हणून उभे केले आहे इथे आधी मान्य करायला शिका... त्यावर अपूर्वा म्हणाली, तुला सांगायची गरज नाही ते माझे मी बघेन... आरोह, विकास, किरण माने, राखी, स्नेहलता यांनी अमृता देशमुखला वजनदार ठरवले... तर अपूर्वाला भार. मीरा, अक्षय, विशाल यांच्या मते अपूर्वा ठरली वजनदार. प्रसाद आणि रोहितमध्ये अक्षय, स्नेहलता, अपूर्वा, राखी, मीरा, अमृता देशमुख, यांनी रोहितला वजनदार ठरवले. तर किरण, अमृता धोंगडे यांनी प्रसादला वजनदार ठरवले.

आता पुढच्या आठवड्यात कोण राहील? कोण जाईल? हे त्यांचा गेम ठरवेल. कोण होईल कॅप्टन? कोण होईल नॉमिनेट? कोण होईल सेफ? हे जाणून घेण्यासाठी बिग बॉसचे आगामी एपिसोड्स बघायला हवेत.

बातम्या आणखी आहेत...