आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मालिका 'दार उघड बये':सानियाने भूमिकेसाठी घेतले संबळ वादनाचे धडे, एक उत्तम नृत्यांगणादेखील आहे अभिनेत्री

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"दार उघड बये" ही नवीन मालिका येत्या 19 सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव अशी तगडी कलाकारांची फौज ही या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. 'वादळवाट'नंतर बऱ्याच वर्षांनी शरद पोंक्षे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहेत.

या मालिकेत सानिया चौधरी मुख्य भूमिका साकारत आहे. नाटक, मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून सानियाने आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे ती एक उत्तम नृत्यांगना असून तिने या भूमिकेसाठी संबळ वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे.

या मालिकेबद्दल आणि तिच्या भूमिकेबद्दल बोलताना सानिया म्हणाली, “ मी मुक्ता ही भूमिका साकारत असून घर सावरण्यासाठी घरूनच चालत आलेली संबळ वाजण्याची कला मी आत्मसात करते. अर्थार्जन करून संबळ वाजवण्याची परंपराही जोपासते. हे एक असं गाव आहे जिथे मुलीच्या हातात संबळ बघणं एक अपशकुन मानलं जातं. फक्त त्या गावात नाही तर महाराष्ट्रातील बऱ्याच गावांमध्ये अजूनही मुलींनी संबळ वाजवणं चांगलं मानलं जात नाही. अशा गावात एक साधी, गरीब पण स्वाभिमान जपणारी मुलगी आणि पुरुष प्रधान संस्कृती यांचा लढा या मालिकेत दिसून येणार आहे."

काय आहे मालिकेची कथा?

संबळ वाजवून उदरनिर्वाह करत पारंपारिकता जपणाऱ्या कुटुंबात आई वडील दोन मुली एक मुलगा आहे. वडील निष्णात संबळवादक असून शहरातील एका श्रीमंत घरात प्रत्येक नवरात्रात संबळ वाजवण्याचा मान त्यांच्याकडे आहे. कर्जापायी सावकार घर हिसकावू पाहत असताना वडील काही दिवसांची सवलत घेऊन त्या गर्भश्रीमंत घरी नवरात्रीच्या नऊ दिवस वाजवण्यासाठी जातात. त्यांना दम्याचा आजार असल्याने काळजीपोटी मोठी मुलगी मंजिरी सोबत जाते. त्या घरातील मुख्य व्यक्ती रावसाहेब नगरकर पुरुषप्रधानमानसिकतेचा असून घरातील बायांवर नाच गाणे वाजवणे या सर्वांवर बंधणे आहेत. त्याची सावत्र आई चंद्रा तामसगीर होती व तिच्यामुळेच माझी सख्खी आई गेली म्हणून तिला एका घरात बंदिस्त केलेले असते. घट बसतानाच्या पहिल्या आणि महत्वाच्या आरतीला वाजवताना वडिलांना दम्याचा प्रचंड त्रास झाल्याने आरती मध्येच थांबवावी लागते. अनेक वर्षांची परंपरा मोडल्याने चिडून रावसाहेब त्यांना घराबाहेर काढत असताना मंजिरी स्वतः संबळ घेऊन वाजवायला उभी राहते. पुरुषी अहंकार असलेल्या कुटुंबप्रमुखाला स्त्रीने देवीपुढे संबळ वाजवणे प्रचंड त्रास देवून जाते. 'दार उघड बये' या मालिकेत सानिया चौधरीसह रोशन विचारे मुख्य भूमिका साकारतोय.

बातम्या आणखी आहेत...