आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:'सही रे सही' फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे कर्करोगाने निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2012 पासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.

मनोरंजन विश्वासाठी आज आणखी एक धक्कादायक बातमी आहे. मालवणी नाट्यक्षेत्रात काम करणा-या अभिनेत्री गीतांजली लावराज कांबळी यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर मुंबईतील चर्नी रोडस्थित सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

गीतांजली या मुळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या होत्या. मुंबईत त्या कामानिमित्त आल्या होत्या. मालवणी भाषेला आणि मालवणी नाटकाला सातासमुद्रापार पोहचवणारे मच्छिंद्र कांबळी यांच्यासोबत गीतांजली यांनी बरंच काम केले होते. याशिवाय भरत जाधवच्या सही रे सही या नाटकातही त्यांनी काम केले होते. त्यांनी 50 हून अधिक व्यावसायिक नाटकात अभिनय केला आहे. शिवाय बकुळ नामदेव घोटाळे, टाटा बिर्ला आणि लैला आणि गलगले निघाले या चित्रपटातदेखील त्या झळकल्या.

काही मीडिया अहवालानुसार 2012 पासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांची आर्थिक परिस्थितीही अगदी बेताची होती. आयुष्यभर त्यांनी मालवणी नाट्यक्षेत्रासाठी काम केले. कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये नाटकांचे दौरे बंद असल्याने त्यांच्यासमोरील संकट आणखी वाढले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीने मदतीचे आवाहन देखील केले होते.