आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा ट्विस्ट:'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेत सई आणि नचिकेत अडकणार विवाह बंधनात

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सईच्या घरचे तिचं आणि नचिकेतचं लग्न लावून देणार आहेत.

पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे छोट्या पडद्यावरील 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंगाने मालिकेची कथा उलगडताना दिसते.

या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांनी पाहिले. नुकतंच या मालिकेत नचिकेतच्या आईची एन्ट्री झाली. सई आणि नचिकेतच्या आईची भेट देखील झाली पण दुर्दैवाने त्या पहिल्याच भेटीत त्यांच्यात खटके उडाले. जेव्हा नचिकेतच्या आईला कळतं की नचिकेतचं सईवर प्रेम आहे तेव्हा ती नचिकेत आणि सईचं नातं तिला मान्य नसल्याचं उघडपणे सांगते आणि त्याला तिच्यासोबत पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सांगते.

या सगळ्यात सई आणि नचिकेतच्या प्रेमाला सईच्या काका-काकांचा पूर्ण पाठिंबा मिळतोय. ते अप्पा आणि नचिकेतच्या आईच्या भांडणांमध्ये सई आणि नचिकेतचं प्रेम भरडंल जाऊ देणार नाहीत. त्यांच्यात दुरावा येऊ नये आणि अप्पा व नचिकेतची आई त्यांना एकमेकांपासून वेगळं करण्याआधीच सईच्या घरचे तिचं आणि नचिकेतचं लग्न लावून देणार आहेत.

आता जेव्हा अप्पा आणि नचिकेतच्या आईला त्या दोघांच्या लग्नाबद्दल कळेल तेव्हा मालिकेत काय नवीन वळण येणार हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...