आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुष्कर-सईची नवीन वेब सीरिज:सई लोकूर आणि पुष्कर जोग घेऊन आले आहेत वेब सीरिज 'सनम हॉटलाईन', ही आहे स्टोरी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही एक विनोदी ढंगाची वेब सीरिज असून ही सीरिज तीन कॉल सेंटर एक्झिक्युटीव्ह भोवती गुंफलेली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर आणि पुष्कर जोग ‘सनम हॉटलाइट’ या सीरिजमध्ये झळकले असून त्यांच्या भूमिका अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या सीरिजमध्ये त्यांच्यासोबत विनय येडेकर व उदय नेने असे लोकप्रिय कलाकारदेखील झळकले आहेत.

ही एक विनोदी ढंगाची वेब सीरिज असून ही सीरिज तीन कॉल सेंटर एक्झिक्युटीव्ह भोवती गुंफलेली आहे. हे तिघे एक अडल्ट हॉटलाईन चालवत असतात. अचानक एके दिवशी कलाटणी मिळते आणि तिघेजण खंडणीच्या जाळ्यात ओढले जातात. आयुष्याची चक्र उलटी फिरू लागतात.

इशान (पुष्कर जोग) आणि त्याचा मित्र अभिजीत (उदय नेने) यांना कॉल सेंटरमधली साचेबद्ध नोकरी गमावण्याची वेळ येते. आता पुढच्या आयुष्यात काहीतरी रोमांचकारी करण्याच्या इच्छेने हे दोघे एडल्ट हॉटलाईन सुरू करतात. या हॉटलाईनचे नाव सनम हॉटलाईन असते. ग्राहकांच्या कल्पना आणि इच्छांचे समाधान तंत्रज्ञानाच्या साह्याने करणारी ही सेवा असते. शिवानी (सई लोकूर) ही दोघांची सहकारी आणि इशानची प्रेयसी ही या मित्रांच्या लहानशा स्टार्ट-अपमध्ये सामील होते. तिघे मिळून ग्राहकांच्या मनीषा, काही काळ मजा म्हणून साथीदाराची इच्छा पूर्ण करतात. त्यांच्या छोटेखानी व्यवसायाला यश मिळते. मात्र, हा आनंद थोडाच वेळ पुरतो. त्यांच्या काही ग्राहकांना खंडणीसाठी कॉल येऊ लागतात. त्यानंतर घडामोडींची मालिका रंगू लागते. तिघांच्या आयुष्याला विनोदी कलाटणी मिळते. अपहरणाला वेगळेच वळण लागते, सनम हॉटलाईनचे ग्राहक खंडणी जाळ्यात अडकत जातात आणि इशान व अभिजीतच्या हातात बेड्या टाकण्यासाठी पोलीस इन्स्पेक्टर जीवाचे रान करतो.

या वेब

सीरिजमध्ये काम करतानाच्या आपल्या अनुभवाविषयी सांगताना पुष्कर जोग म्हणाला, “डिजीटल माध्यमावर काम करताना माझ्याच अदाकारीवर प्रयोगशील राहण्याची संधी मिळाली. कॅफेमराठी सोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. हंगामा प्ले’वर प्रेक्षक नक्कीच शो’ची मजा घेतील याचा विश्वास वाटतो. त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पहातो आहे.”

आकाश गुरसाले दिग्दर्शित ही सीरिज मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हंगामा प्ले आणि त्याच्या सर्व पार्टनर नेटवर्कवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser