आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:तब्बल तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर, लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू केले शुटिंग

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना सई ताम्हणकर खूप उत्साहित होती.

मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कहोलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी रिएलिटी  शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना सई ताम्हणकर खूप उत्साहित होती.

सई म्हणाली, “पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना खूप संमिश्र भावना आहेत.  एकिकडे थोडीशी भीती आणि चिंता दाटून आली असतानाच मन खूप उत्साहित झालेले आहे. सेटवर डॉक्टर आहेत. रूग्णवाहिकाही बोलवण्यात आलीय. सेटवर आल्याआल्या टेंपरेचर चेक करणे, सतत हात धुणे, सॅनिटायझर बाळगणे, अशा  सेटवर सगळ्या सावधगिरीच्या उपाययोजना बाळगल्या जात आहेत. लोकांना टीव्हीवरचे तेचतेच एपिसोड पाहून कंटाळा आल्याने नव्या एपिसोडचे चित्रीकरण सुरू केले आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा आशिर्वाद असू द्या.”   

दिलेली कमिटमेंट पूर्ण करणा-यांमधली सई ताम्हणकर आहे, हे तिने ह्याअगोदरही दाखवून दिले आहे. बॉलिवूड चित्रपट ‘मीमी’च्या सेटवर अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही, लॉकडाऊन होणार हे कळल्यावर दुख-या पायासह सई मार्च महिन्यात रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. आताही लॉकडाउन उघडल्यावर निर्माते आणि प्रेक्षकांसाठी असलेली आपली बांधिलकी जपत, सई ताम्हणकर चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली. 

बातम्या आणखी आहेत...