आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिचर आर्टिकल:'समांतर 2' मध्ये सई ताम्हणकरचा पुन्हा एकदा रेट्रो लूक, कुमार महाजनच्या आयुष्यात येणारी 'ती' गूढ स्त्री सईच तर नाही ना?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही 10 भागांची सीरिज आहे.

'समांतर'च्या पहिल्या सीझनने त्याचा शेवट एका वेगळ्याच वळणावर आणून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली. त्यामुळे प्रेक्षक सीझन 2 ची अतिशय आतुरतेने वाट पाहात होते. 'समांतर 2' विषयीच्या एक एक गोष्टी उलगडत असतानाच ट्रेलरमधून सई ताम्हणकरचा चेहरा समोर आला. कुमार महाजनच्या आयुष्यात येणारी 'ती' गूढ स्त्री सई ताम्हणकरच आहे का? याविषयी चर्चा सुरु झाली. आणि त्यातच आता सईने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक व्हिडिओ शेअर करत 'समांतर 2' मधील तिचा लूक आपल्यासमोर आणला आहे.

या रेट्रो लूकमध्ये सई अतिशय मोहक दिसत असून तिचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे. त्याच जोडीने तिच्या भूमिकेविषयीची उत्सुकताही वाढवत आहे. यापूर्वीही सई 'दुनियादारी'मध्ये रेट्रो लूकमध्ये दिसली होती. तिचा तो लूक तेव्हाही चाहत्यांना भरपूर आवडला होता.

'समांतर 1' मध्ये कुमार महाजन सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतो, जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे. कुमारच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, हे चक्रपाणीला माहित आहे. त्यामुळे आपला भूतकाळ (डायरी) तो कुमारच्या हाती सोपवतो. ज्यात कुमारचा भविष्यकाळ दडला आहे. यातील एकएक भविष्य वाचत असतानाच आणि ते टाळण्याचा प्रयत्न करत असतानाच तुझ्या आयुष्यात एक स्त्री येणार असल्याचे भाकीत समोर येते. आता कुमार हे भाकीत खोटं ठरवणार की कुमारच्या आयुष्यात आलेली ती गूढ स्त्री कुमारचे आयुष्य अधिकच गुंतागुंतीचे करणार आणि चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचं भविष्यकाळ ठरणार, हे आता 'समांतर' सीझन 2 पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.

सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज आहेत. तर स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती. सुहास शिरवळकर यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ही सीरिज बेतली आहे. ही 10 भागांची सीरिज आहे. 1 जुलैपासून एमएक्स प्लेअरवर हा शो प्रेक्षकांना मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेमध्ये विनामूल्य पाहता येणार आहे. पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते तर दुसरे पर्व समीर विद्वांस दिग्दर्शित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...