आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तानाजीचा नवा सिनेमा:'सैराट'मधील बाळ्या पुन्हा एकदा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी थिएटरमध्ये नव्हे तर छोट्या पडद्यावर रिलीज होतोय सिनेमा

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गस्त' हा चित्रपट 28 फेब्रुवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.

'सैराट'मधील परश्याचा मित्र बाळ्या याला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. त्याच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला. आता हाच बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत 'गस्त' या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तानाजी म्हणाला, "मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. त्यांच्या प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे."

गेल्या वर्षी झी टॉकीजने 3 टॉकीज ओरिजनल चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर केली आणि यावर्षी ही वाहिनी 'गस्त' या चित्रपट घेऊन आली आहे.

बातम्या आणखी आहेत...