आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:सलमान खानने इंडस्ट्रीतील  25,000 कामगारांना केली मदत, प्रत्येकाच्या खात्यात 6000 रु. केले ट्रान्सफर 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरमहा 3,000 या हिशोबाने ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.

कोविड -19 मुळे लॉकडाऊन सुरु असून चित्रपटसृष्टीत रोजंदारीवर काम करणा-या अनेक कामगारांवर रोजीरोटीचे संकट ओढवले आहे. या संकटात 25,000 कामगारांना मदत करण्यासाठी सलमान खान पुढे आला आणि या सर्व कामगारांचा खर्च उचलण्याचे आश्वासन त्याने दिले. सलमानने दिलेला शब्द पाळला असून त्याने सर्व 25,000 कामगारांना मदत केली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूआयसीई) ने सलमानला कामगारांचे खाते क्रमांक दिले, त्यानंतर सलमान खानने प्रत्येकाच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून आर्थिक मदत केली आहे.

प्रत्येकी 6000 रुपयांची मदत: अशोक दुबे यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी गेली दोन वर्षे एफडब्ल्यूआयसीईचा सरचिटणीस आहे आणि सलमानने यावेळी सुमारे दीड कोटींची मदत केली आहे. यापूर्वी आम्ही त्यांना 19 हजार कामगारांची यादी दिली होती, त्यानंतर उर्वरित कामगारांची यादीही देण्यात आली आणि सलमानने प्रत्येक खात्यात 6000 रुपये जमा केले आहेत. (दरमहा 3,000) या हिशोबाने ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.  

गरिबांना अन्न पुरवले गेले: कोणीही उपाशी झोपू नये म्हणून सलमान खानने ट्रक भरुन गरीबांसाठी रेशन पाठविले आहे. सलमानने याविषयीची कोणताही गाजावाजा केला नाही, पण त्याचे मित्र बाबा सिद्दीकी यांनी ट्विटरवर गोडाऊनचा एक फोटो शेअर करुन रेशनने भरलेले ट्रक उभे असल्याची माहिती दिली होती. बाबा सिद्दीकी यांनी छायाचित्र शेअर करुन म्हटले होते, 'तुम्ही नेहमीच इतरांना मदत करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे असता आणि पुन्हा एकदा तुम्ही ते सिद्ध केले आहे. कोरोनाव्हायरसच्या युद्धात साथ दिल्याबद्दल आणि कुणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घेतल्याबद्दल सलमान खानचे आभार.'

बातम्या आणखी आहेत...