आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वेड' लावायला आला सलमान खान:रितेशच्या वाढदिवशी भाईजानचे स्पेशल गिफ्ट, 'वेड लावलय' गाणे लवकर येणार भेटीला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी वेड या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. या चित्रपटात भाईजान सलमान खान झळकणार असल्याची चर्चा होती. पण आता ही चर्चा नसून भाईजान खरंच या चित्रपटातून चाहत्यांना भेटणार आहे. होय सलमान खानचा स्वॅग प्रेक्षकांना वेड लावणार आहे. आज रितेशच्या वाढदिवशी सलमान खानवर चित्रीत झालेल्या 'वेड लावलय' या गाण्याचा टिझर रिलीज करण्यात आला आहे.

अभिनेता सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गाण्याचा टिझर शेअर केला आहे. रितेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा टिझर शेअर केल्याचे त्याने सांगितले आहे. "भाऊचा बर्थडे आहे, गिफ्ट तो बनता है..." असे कॅप्शन सलमानने दिले आहे.

'भाऊ इज बॅक' म्हणत हे संपूर्ण गाणे लवकरच रिलीज होणार असल्याचे टिझरमध्ये सांगण्यात आले आहे. टिझरमध्ये रितेश सलमानसोबत थिरकताना दिसत आहे. याआधी रितेशच्या 'लय भारी' या चित्रपटात सलमान झळकला होता. आता 'वेड' या चित्रपटातही सलमान कॅमिओ साकारतोय.

'वेड' या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह रितेशने यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. रितेशसह जिनिलीया देशमुख, अशोक सराफ, जिया शंकर, विद्याधर जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत. येत्या 30 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...