आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना वॉरियर्सना सलाम:मुंबई व महाराष्ट्र पोलिसांना ‘वंदे मातरम’ व्हिडीओद्वारे मानाचा मुजरा, गाण्याला आर्या आंबेकरचा स्वरसाज  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऋषी सेठिया आणि शैलेंद्र सिंग यांची निर्मिती
  • सलील कुलकर्णी यांचे संवेदनशील संगीत तर आर्या आंबेकरचा भावपूर्ण आवाज

कोविड या अनपेक्षित आणि अभूतपूर्व अशा जागतिक महामारीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण आपापल्यापरीने सामाजिक जाणीव व्यक्त करत इतरांना मदत करत आहे. या महासंकटाच्या काळात ज्यांना ‘कोविड योद्धे’ म्हटले जाते ते पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय सेवक यांचे योगदान मोठे आहे. हे सर्व स्वतःच्या जीविताला असलेला धोका पत्करून आपल्यासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी काम करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढावे व त्यांना मनाचा मुजरा करावा म्हणून निर्माते शैलेंद्र सिंग आणि बिझनेसमन ऋषी सेठिया यांनी एकत्र येवून एक मानवंदना लघुपट निर्माण केला आहे. संगीतकार सलील कुलकर्णी यांनी तो संगीतबद्ध केला असून आघाडीची पार्श्वगायिका आर्या आंबेकर हिने त्यातील ‘वंदे मातरम’ गीत गायले आहे.

हा दोन मिनिटांचा व्हीडीओ म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या शौर्याला मानवंदना असून त्यात मुंबईतील पोलिसांचे विविध मूड आणि सेवेतील क्षण टिपले गेले असून त्या ज्या कठीण व आव्हानात्मक परिस्थितीत सेवा बजावत आहेत, त्याचे चित्रण आहे. ‘वंदे मातरम’च्या धुनीवर हा व्हिडीओ चित्रित झाला आहे. या चित्रफितीचे संकलन मनन कोठारी यांनी केले आहे.

या चित्रफितीचे लेखन आणि दिग्दर्शन शैलेंद्र सिंग यांनीच केले आहे. ते या व्हिडीओबद्दल म्हणतात, “महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस जे काम करत आहेत, त्याची झलक पूर्ण भारताला देण्याचा माझा मानस यामागे आहे. हे शूरवीर आज घरी जावू शकत नाहीत किंवा कुटुंबाला वेळ देवू शकत नाहीत. या व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण जगातील भारतीयच आपल्या या पोलिसांना मानवंदना देत आहेत.”

ऋषी सेठिया यांचे महत्वाचे योगदान या निर्मितीमध्ये राहिले आहे. त्यांनीही या व्हिडीओच्या माध्यमातून  पोलीसांप्रती असलेली कृतज्ञता आपण व्यक्त केली असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...