आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू एंट्री:'अस्सं महेर नको गं बाई' या मालिकेमध्ये होणार समीर चौघुलेची एंट्री, दिसणार गंडावरे बाबांच्या भूमिकेत!

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अस्सं महेर नको गं बाई' या मालिकेमध्ये होणार गंडावरे बाबांचं आगमन

समीर चौघुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत सगळ्यांना माहीत आहे. समीर आपल्या विनोदी अभिनयानं आणि कमाल टाइमिंगनं सगळ्यांचा लाडका झाला आहे. समीर आता प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत दिसणार आहे आणि ती भूमिका आहे गंडावरे बाबांची. छोट्या पडद्यावरील 'अस्सं माहेर नको गं बाई' या मालिकेतल्या उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचं आगमन होणार आहे.

मालिकेतली सखीची आई अनसूया ही गंडावरे बाबांची भक्त आहे. तिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असतो आणि आता या गंडावरे बाबांचं मालिकेत आगमन होणार आहे. हे गंडावरे बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सर्वांचा लाडका समीर चौघुले.गंडावरे बाबा हे विनोदी पात्र असून याच्या मालिकेत 14 जानेवारीला आगमन होणार आहे, गंडावरे बाबांच्या येण्यानी मालिकेमध्ये आणि उपासनेंच्या घरी काय धमाल होते, हे मालिकेच्या येणा-या भागांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser