आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावर नव्याने दाखल होत असलेल्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेद्वारे अभिनेत्री सानिया चौधरी पदार्पण करते आहे. मुख्य भूमिका असलेली ही तिची पहिलीच मालिका. लहानपणापासूनच सानियाला अभिनय आणि नृत्याची आवड होती. सानिया मुळची पुण्याची त्यामुळे पुण्यातच तिने नृत्य शिकण्यासोबतच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अनेक वर्कशॉप्स, नाट्यस्पर्धा आणि थिएटर केल्यानंतर तिला हिंदी वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सानियाचं टॅलेण्ट पाहून तिला ‘सांग तू आहेस का’ मालिकेसाठी ऑडिशनसाठी सांगण्यात आलं. पाच ते सहा वेळा ऑडिशन आणि लूक टेस्ट दिल्यानंतर तिची वैदेही या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली.
'माझ्यासाठी हा प्रवास स्वप्नवत असल्याचं सानिया सांगते. मालिकेचा प्रोमो ऑनएअर गेल्यानंतर मला खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. हॉरर आणि रोमान्स हा जॉनर मी पहिल्यांदाच करत आहे. त्यामुळे खूप उत्सुकता आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि शिवानी रांगोळेसोबत पहिल्यांदाच काम करते आहे. आम्ही तिघेही पुण्याचे असल्यामुळे आम्हा तिघांची खूप छान गट्टी जमली आहे. हीच केमिस्ट्री तुम्हाला मालिका बघताना नक्कीच जाणवेल', असे सानिया सांगते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.