आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजा रानीची गं जोडी:रणजीत–कुसुमावतीमध्ये असलेला अबोला दूर होणार? संजूचे कुसुवातीला वचन !

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेला रंजक वळण...

'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी आईसाहेबांनी म्हणजेच कुसुमावतीने रणजीत आणि संजूचे बाळ पाडले होते हे सत्य बेबीमावशीने सगळ्यांपुढे आणले होते. रणजीतला याबद्दल काहीही कल्पना नसताना, त्याला खोट सांगून आईसाहेबांनी हा प्रकार घडवून आणला. हेदेखील रणजीतल समजले. त्या दिवसापासून रणजीतने कुसुमावतीला आई म्हणणार नाही असे वचन दिले होते. त्यानंतर मालिकेमध्ये नऊ महिन्यांचा लिप घेण्यात आला आणि संजू PSI बनून ढालेपाटलांच्या घरी आली. पण इतके महीने जाऊन देखील रणजीत आणि कुसुमावती मधील अबोला तसाच काम आहे हे संजूला जावणले.

इतक्या महिन्यांपासून दोघे एकमेकांशी आपुलकीने बोलत नाही याचा संजूला खूप त्रास होत आहे. यामुळेच संजू आईसाहेबांना वचन देते की, 'आता मी आली आहे. रणजीत आणि तुमच्यामधील अबोला मी नक्कीच दूर करेन’ रणजीतला याविषयी काही कल्पना नाहीये.

येत्या काही भागांमध्ये रणजीत कुसुमावतीला आईसाहेब म्हणून पुन्हा हाक मारणार आहे. पण असे काय घडले ज्यामुळे त्याने आईसाहेब अशी हाक मारली? त्यांच्यातील दुरावा संजू मिटवू शकेल? त्यासाठी ती अजून काय प्रयत्न करेल? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...