आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालदिन विशेष:सारेगमप लिटिल चॅम्पसह परीने स्वीटू आणि ओमसह साजरा केला बालदिन साजरा, 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेच्या सेटवर झाले खास सेलिब्रेशन

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व लिटिल चॅम्प्स आणि परी म्हणजेच मायरा या सगळ्यांनी मिळून दंगा केला.

झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स मधील सर्व स्पर्धकांनी आपल्या गाण्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसंच लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील परीने तर आपल्या निरागस अभिनयाने आबालवृद्धांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपल्याकडे म्हटलं जातं. लहान मुलांना हरप्रकारे आनंद देण्याचा हक्काच दिवस म्हणजे बालदिन. त्यांच्या हक्काच्या दिवशी सर्व लिटिल चॅम्प्स आणि परी म्हणजेच मायरा या सगळ्यांनी मिळून दंगा केला.

स्वरा जोशी, पलाक्षी दीक्षित, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, ओंकार कानेटकर, रीत नारंग, सारंग भालके या सगळ्यांनी मिळून परिसोबत मालिकेच्या सेटवर खूप धमाल केली. इतकंच नव्हे तर त्यांच्या जोडीला ओम-स्वीटू म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर देखील शामिल होते. ओम आणि स्वीटूसुद्धा या मुलांच्यासोबत त्यांच्या वयाचे होऊन मजा-मस्ती करत होते.

बालदिनाच्या या खास सेलिब्रेशनबद्दल बोलताना स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता म्हणाली, "ही सगळी मुलं प्रचंड गोड आहेत आणि त्यांच्या खास दिवशी ते आमच्या सेटवर येऊन दंगा करत असताना आम्ही देखील स्वतःला त्यांच्या वयाचे होण्यापासून थांबवू नाही शकलो. मी देखील लहानपणी खूप मस्तीखोर होती त्यामुळे या सर्व मुलांना बघून मला माझे बालपणीचे दिवस आठवले. परी आणि माझं बॉण्डिंग खूपच छान आहे आणि ती आमच्या मालिकेच्या सेटवरील प्रत्येकाची खूप लाडकी आहे. ती जेव्हा ही आम्हाला भेटतो आम्ही खूप धमाल करतो. या बालदिनानिमित्त आम्ही सगळे लिटिल चॅम्प्स आणि आमच्या परी सोबत खूप मस्ती केली आणि हा बालदिन मला नेहमी लक्षात राहील."

धमाल मस्ती करताना मायरा म्हणाली, "मी आज स्वरा दीदी आणि इतर लिटिल चॅम्प्स सोबत खूप मजा केली. स्वीटू दीदी मला नेहमी चॉकलेट्स देते आणि आज पण ती आमच्यासोबत सेलिब्रेट करतेय. मला या सगळ्यांसोबत खूप मजा आली."

बातम्या आणखी आहेत...