आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एंगेज्ड:'सारेगमप लिट्ल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडचा झाला साखरपुडा, लवकरच होणार पुण्याची सून; बघा साखरपुड्याचे फोटो

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26 जुलै रोजी कार्तिकी आणि रोनितचा साखरपुडा झाला.

'सा रे ग म प- लिट्ल चॅम्प्स'ची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 26 जुलै रोजी रोनित पिसे या तरुणासोबत कार्तिकीचा साखरपुडा झाला आहे. कार्तिकीने साखरपुड्याचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. फोटो शेअर करुन 'एंगेज्ड', असे कॅप्शन तिने दिले आहे.

गेल्या महिन्यातच कार्तिकीच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला होता.

कार्तिकीचा भावी पती रोनित व्यवसायाने मॅकेनिकल इंजिनियर आहे, शिवाय त्याचा स्वतःचा व्यवसायदेखील आहे.

रोनित हा कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड यांच्या मित्राचा मुलगा आहे. तिच्या कांदेपोह्याच्या कार्यक्रमाचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

रोनित आणि कार्तिकी यांचे अरेंज मॅरेज आहे.

लाल रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये कार्तिकी अतिशय सुंदर दिसली. साखरपुड्याचे खास फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

एका मुलाखतीत कार्तिकीने याविषयी सांगितले होते की, 'हे सगळं अचानक ठरले. आमचे अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.' सध्या तरी लग्नाची तारीख ठरली नसल्याचे असे कार्तिकीने सांगितले.

कार्तिकी गायिका म्हणून आपल्या सर्वांनाच परिचीत आहे. याशिवाय ती 'गजर कीर्तनाचा' या कार्यक्रमाची निवेदिका म्हणूनदेखील प्रेक्षकांसमोर आली आहे.