आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' उत्कंठावर्धक वळणावर:अद्वैतच्या आईच्या रूपात दिसणार नेत्रा, उडणार रुपालीची झोप

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबातून बाहेर काढण्यात रुपाली यशस्वी होते, त्यामुळे नेत्रा तिच्या घरी परत जाते. अद्वैतवर हल्ला होतो, हे नेत्रा शेखरला सांगते त्यामुळे अद्वैतचा जीव वाचतो. शेखर नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबात परत आणतो आणि नेत्राची खरी ओळख सगळ्यांना सांगतो. अशा प्रकारे, सगळ्यांना समजतं की नेत्रा ही अव्दैतचं रक्षण करण्यासाठी या घरात आलेली आहे. अद्वैत यावर विश्वास ठेवत नाही.

दुसरीकडे, नेत्रा आणि रुपाली एकमेकांसमोर येतात आणि एकमेकांना आव्हान देतात. नेत्रा रुपालीला अद्वैतच्या आईच्या रूपात दिसल्याचा भास होतो. आता नेत्राचं हे बदलेलं रूप रुपालीची झोप उडवणार का? हे पाहणे रोमांचक असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...