आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:'मुलगी झाली हो'मध्ये सोशिक आईची भूमिका साकारतेय शर्वाणी पिल्लई, सांगतेय आपल्या भूमिकेविषयी बरंच काही

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शर्वाणी म्हणते, मी साकारत असलेली आई सोशिक असली तरी त्या सोशिकतेमागे खूप कारणं आहेत.

स्टार प्रवाहवर 2 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजही कित्येक ठिकाणी वंशाला दिवा हवाच या हव्यासापोटी मुलीचा भृण गर्भातच संपवला जातो. तिच्या जगण्याचा मुलभूत हक्कच नाकारला जातो. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून याच भावनिक विषयावर भाष्य करण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे साजिरीची. जिचा जन्मच तिच्या पित्याकडून नाकारण्यात आला. अशा या साजिरीचं काय असेल भविष्य? याची भावनिक गोष्ट ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री शर्वाणी पिल्लई महत्त्वाची भूमिका वठवत आहे. यानिमित्ताने शर्वाणीसोबत झालेला हा संवाद

  • ‘मुलगी झाली हो’ मालिकेचं वेगळेपण काय सांगशील?

मुलगी झाली हो मालिकेचा विषय अतिशय संवेदनशील आहे. जेव्हा मला या मालिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार कळवला. मालिकेतून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे. आपल्या मुलीसाठी आणि आपल्या तत्वांसाठी एक आई कशी उभी ठाकते याची गोष्ट खूप सुंदररित्या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.

  • मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेविषयी...

व्यक्तिरेखेविषयी सांगायचं तर मालिकेत मी आई साकारते आहे. एक अशी आई आहे जिने विरोध पत्करुन मुलीला जन्म दिला, इतकंच नाही तर एकटीने तिची संपूर्ण जबाबदारीही स्वीकारली. मी साकारत असलेली आई सोशिक असली तरी त्या सोशिकतेमागे खूप कारणं आहेत. मालिकेच्या भागांमधून ती हळूहळू उलगडत जातील आणि प्रेक्षकांना पटतील अशी आशा आहे. ही मालिका करताना एक अभिनेत्री म्हणून खूप समाधान वाटतंय. सविता मालपेकर, किरण माने या माझ्या सहकलाकारांसोबत काम करताना खूप मजा येतेय.

  • मालिकेत तुझ्यासोबत जी चिमुकली आहे तिच्यासोबतची तुझी केमिस्ट्री कशी आहे?

आम्ही सगळे सेटवर तिला माऊच म्हणतो. माऊ अतिशय गोड आहे. पहिल्या भेटीतच तिने आम्हा सर्वांचं मन जिंकून घेतलं. ती अतिशय हुशार आहे. कोणतही गोष्ट ती लगेच आत्मसात करते. मला खूप कौतुक वाटतं माऊचं. माझी आणि माऊची केमिस्ट्री तुम्हाला नक्कीच आवडेल. मालिकेच्या प्रोमोजनाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे.

  • या मालिकेतून सामाजिक विषयावर भाष्य करण्यात येणार आहे त्याविषयी काय सांगशील?

अगदी बरोबर आहे. मुलगी झाली हो या वाक्यात दोन सूर नक्कीच पाहायला मिळतात. कधी तो सूर आनंदाचा असतो तर कधी निराशेचा. वंशाला दिवा हवा, मुलगी म्हणजे परक्याचं धन हे संवाद आपल्या हमखास कानी पडतात. मात्र आपल्या गर्भात नऊ महिने जीव वाढवणारी स्त्री किती श्रेष्ठ आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. जगन्माता देवीची आपण उपासना करतो मग तिचाच अंश असणाऱ्या तिच्या जन्माचाही खुल्या दिलाने स्वीकार करायला हवा असंच मला वाटतं. मालिकेतून नेमका हाच विचार मांडण्याचा प्रयत्न आहे.