आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी मालिका:शशांक केतकरनंतर त्याची धाकटी बहीण करतेय टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण, जाणून घ्या दीक्षा केतकरच्या पहिल्या मालिकेविषयी

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीक्षा केतकर हे शशांकच्या धाकट्या बहिणीचे नाव असून 'तू सौभाग्यवती हो!' या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शशआंक केतकर लवकरच 'पाहिले ना मी तुला' या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे शशांकच्या पावलावर पाऊल ठेवत आता त्याची धाकटी बहीणदेखील छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय.

सोनी मराठी वाहिनीवर नुकताच नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेमध्ये एक नवीन, बोलक्या डोळ्यांचा आणि ताजा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि तो आहे दीक्षा केतकर या अभिनेत्रीचा. दीक्षाची ही पहिलीच मालिका आहे. 'तू सौभाग्यवती हो!' हे दीक्षाच्या मालिकेचे नाव आहे. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत.

या प्रोमोमध्ये दीक्षा खूप निरागस आणि हसरी दिसते आहे. या नव्या चेहऱ्याला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मालिकेत दीक्षाने ऐश्वर्या हे पात्र साकारले आहे. वयानी खूप मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबरोबर ऐश्वर्या का लग्न करते आणि जाधव घराण्याची सून कशी होते, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...