आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शीतली-आज्याचा रोमँटिक अंदाज:'लागिरं झालं जी'नंतर पुन्हा एकदा एकत्र आले शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण, आता वेगळ्या अंदाजात दिसणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवानी बावकर आणि नितीश चव्हाणची जोडी पुन्हा झळकणार एका वेगळ्या अंदाजात

'सजलं रूप तुझं,रुजलं बीज नवं उधाण वारं हसतंय धजलं तुझ्या म्होर, फसलं आता खरं पाखरागत उडतंय.....'

अशा गावरान भाषेत प्रेमाचे बोल ओठावर आणत आणि मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या या गाण्याच्या बोलांनी तर जणू हृदयाचा ठेकाच चुकवला आहे. सध्या रसिक प्रेक्षकांत रोमँटिक गाण्यांची क्रेझ जरा जास्तच आढळून येत आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी हे प्रेमाचे तरल गीत एका म्युझिक व्हिडिओसह प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याची आकर्षणाची बाजू म्हणजे 'लागीरं झालं जी' फेम शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण म्हणजेच आपले शीतली आणि आज्या यांची जोडी या गाण्यातून रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत.

प्रेम ही भावना मनात तरंग उमटवणारी आहे. आयुष्यात प्रत्येकजण एकदा तरी प्रेमातच पडतो. अशा हव्याहव्याशा वाटणाऱ्या एका गुलाबी नात्याचे पदर उलगडणारे आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडवणारे एक प्रेमगीत अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता नितीश चव्हाण प्रेक्षकांच्या भेटीस एका आगळ्या वेगळ्या अंदाजात घेऊन येत आहेत. ‘एव्ही प्रॉडक्शन’प्रस्तुत ‘मन उनाड’ या यशस्वी गाण्यानंतर त्यांचे हे नवेकोरे ‘चाहूल’ गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘एव्ही प्रॉडक्शन’सह ‘मराठी म्युझिक टाऊन’ या म्युझिक लेबलने ही या गाण्याला प्रस्तुत केले असून या म्युझिक लेबल अंतर्गत असलेले हे पहिलंवहिलं गाणं आहे.

या गाण्याचं दिग्दर्शन ओंकार मानेनं केलं आहे. ओंकार याआधी ‘बेखबर कशी तू’ या म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. शिवाय ‘चंद्र झुल्यावर’, ‘तू ये साथीला’ याही गाण्यांच्या दिग्दर्शनाची धुरा ओंकारने सांभाळली. निर्माता विश्वजितचे हे मराठीसृष्टीतील दुसरे गाणे असून याआधी त्याने ‘दिल बुद्धू’ या हिंदी गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या दमदार आणि सुमधुर आवाजात गायक विजय भाटे याने हे गाणे गायले आहे. तर गाण्याचे बोल राहुल थोरात यांचे असून आशिष आणि विजय यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser