आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन म्युझिक व्हिडिओ:शिवानी बावकरचा नवा म्युझिक व्हिडिओ, आता वाजणार 'लग्नाची पिपाणी'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'सप्तसूर म्युझिक'च्या युट्यूब चॅनेलवर लवकर नवा म्युझिक व्हिडिओ

आतापर्यंत लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही प्रचंड लोकप्रियही झाली. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या 'लग्नाची पिपाणी' या नव्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ लवकरच सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात दिसणार आहे.

म्युझिक व्हिडिओची निर्मिती सुधाकर फाळके आणि प्रकाश फाळके यांनी केली आहे. तर म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन प्रकाश फाळके यांचं आहे. दिनकर खाडे यांचं गीत मधुर मिलिंद शिंदे यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे. सचिन कांबळे यांनी नृत्य दिग्दर्शन, सुनीत गुरव यांनी छायांकन केलं आहे. अलिबाग, जुन्नर या ठिकाणी हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे.

अतिशय फ्रेश असं हे गाणं, उत्तम छायांकन प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीला उतरेल आणि लग्नाच्या सीझनमध्ये प्रत्येक लग्नात ही "लग्नाची पिपाणी" वाजेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...