आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लगीनघाई:अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या हातावर सजली विराजसच्या नावाची मेंदी, लवकरच अडकणार दोघे लग्नाच्या बेडीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 3 मे रोजी विराजस आणि शिवानी लग्नबंधनात अडकणार आहेत.

बॉलिवूडनंतर आता मराठी मनोरंजन विश्वात सनई चौघड्यांचे सूर ऐकू येणार आहेत. मराठीतील क्यूट कपल विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. 1 मे रोजी शिवानी आणि विराजसचा मेंदी सोहळा पार पडला. नुकताच शिवानीच्या मेंदी समारंभाचा व्हिडिओ समोर आला आहे. येत्या 3 मे रोजी विराजस आणि शिवानी लग्नबंधनात अडकणार आहेत.

शिवानीने तिच्या मेंदी समारंभाचा व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. खास मेंदी सोहळ्यासाठी तिने हिरव्या रंगाच्या ड्रेसची निवड केली. सोबतच त्याला शोभेसे असे फुलांचे दागिने देखील घातले. शिवानी आणि विराजसच्या मेंदी सोहळ्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड़ व्हायरल होत आहे

अशी आहे दोघांची लव्हस्टोरी
विराजस कुलकर्णी दिग्दर्शित 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात शिवानीने अभिनय केला होता. तिथेच दोघांची ओळख झाली होती. याचवर्षी जानेवारी महिन्यात दोघांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची ऑफिशिअल घोषणा केली होती. या फोटोत शिवानी तिच्या हातातील अंगठी दाखवताना दिसली होती. फोटो शेअर करताना शिवानीने लिहिले होते, 'अंगठी घातली...' यासह तिने #virani (विरानी) हा हॅशटॅग वापरला होता.

अभिनेत्यासोबतच लेखक आणि दिग्दर्शक आहे विराजस
विराजस हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. विराजसने 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. विराजस अभिनेत्यासोबत एक लेखक आणि दिग्दर्शकही आहे. 'थेटर ऑन एंटरटेन्मेंट' ही विराजसची निर्मिती संस्था असून त्याने अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. 'अनाथेमा' या नाटकात त्याने अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली होती. शिवाय मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तर शिवानीदेखील मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने 'बन मस्का' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. 'सांग तू आहेस ना', ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...